सिनेअभिनेत्री अनुष्का शर्माला तिच्या आजारपणामुळे “दिल धडकने दो‘ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला जाता आले नाही. झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटाचे सध्या कोलकत्यामध्ये चित्रीकरण सुरू आहे. शनिवारी एका चित्रपटाच्या प्रमोशनचा कार्यक्रम आटोपल्यानंतर अनुष्का आजारी पडली होती.
अनुष्काला उष्णतेचा त्रास सुरू झाल्याने डॉक्टरांनी तिला सक्तीची विश्रांती घ्यायचा सल्ला दिला आहे. यामुळे तिच्या शूटिंगवर पाणी पडले. हा चित्रपट पाच जून रोजी रिलीज होणार असून फरहान अख्तर, अनिल कपूर, रणवीर सिंह, शेफाली शहा आणि प्रियांका चोप्रा आदींचा अभिनय यातून पाहता येईल.