अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ रविवारी झालेल्या कार बॉम्बस्फोटात तीन ठार तर १८ जण जखमी झाले.
सकाळच्या वेळेस हा स्फोट झाला. विमानतळापासून १०० मीटर अंतरावरील परिसरातील अफगाण नागरी हवाई प्राधिकरणाच्या कार्यालयाजवळ विस्फोटक पदार्थांनी भरलेल्या कारचा स्फोट झाला.
यामध्ये तीन जण ठार झाले तर १८ नागरिक जखमी झाले. जखमींमध्ये आठ महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. तीन परदेशी नागरिकही यात जखमी झाले.
या स्फोटामुळे काही घरे तसेच दुकानांचेही नुकसान झाले. तसेच एक परदेशी वाहन आणि दोन नागरिकांची वाहने उद्धव्स्त झाली. दरम्यान, या स्फोटाची जबाबदारी तालिबानी संघटनेने घेतली आहे.
गेल्याच आठवड्यात काबूल गेस्ट हाऊसवर झालेल्या हल्ल्यात १४ जण ठार झाले होते. यामध्ये नऊ परदेशी नागरिकांचा समावेश होता.