ऑरेंज सिटी नागपूर बनली पिंक सिटी; केसीआर यांच्या दौऱ्यानिमित्त बीआरएसचे गुलाबी झेंडे

ऑरेंज सिटी अशी ओळख असलेले नागपूर गुरुवारी पिंक सिटी झाल्यासारखे वाटत होते. त्याला कारण ठरले भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा नागपूरचा दौरा.

महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या आपला पक्ष मजबूत करण्यासाठी के चंद्रशेखर राव नागपुरात आले. त्यांच्या स्वागतासाठी भारत राष्ट्र समितीने नागपुरात जय्यत तयारी केली आहे. ठिकठिकाणी पक्षाचे झेंडे, बॅनर, पोस्टर्स लावण्यात आले असून त्याच्या माध्यमातून तेलंगणा सरकारच्या विविध योजना आणि त्यांची माहिती जनतेसमोर मांडण्यात आली आहे.

पाच तासांच्या नागपूर दौऱ्यात राव ज्या मार्गाने जाणार ते रस्ते पक्षाच्या गुलाबी रंगांच्या झेंड्यांनी सजवण्यात आले आहे. राज्यातील पहिल्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *