उष्णतेच्या लाटेत मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ, अशी घ्यावी काळजी

उन्हापासून दूर रहा

उन्हाळ्यात लोकांना कधी कधी सहलीला जाण्याचा प्लॅन करतात. किंवा भर उन्हात फिरायला जातात. मात्र मधुमेह असलेला व्यक्ती खूप वेळ उन्हात राहिल्यास त्यांना थकवा येण्याचा धोका अधिक आहे. या दिवसात गरगरल्यासारखे वाटणे, घाम येणे, स्नायूंमध्ये पेटके येणे, चक्कर येणे, डोकेदुखी, हृदयाची धडधड वाढणे आणि मळमळणे यांसारख्या लक्षणांकडे लक्ष ठेवा. ‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‌

 व्यायाम करा

आराम हा उन्हाळा सुखात घालवायच मंत्र आहे हे खरे, पण मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यासाठी व्यायामही तितकाच महत्त्वाचा आहे. तुम्ही जर पहाटे लवकर किंवा संध्याकाळी उशीरा घराबाहेरचे वर्कआऊट करु शकता. पण जेव्हा उन्हाळ्याचा पारा वाढेल असे वाटतं असेल तेव्हा घरातल्या घरात व्यायाम करणे किंवा योगासने करणे योग्य राहील.

योग्य आहार घ्या

मधुमेह असलेल्या व्यक्तींनी संतुलित आणि सकस आहारपद्धतीचे पालन करावे. शरीरातील ग्लुकोजची स्थिती बिघडवतील असे पदार्थ खाण्याचे मोह टाळला पाहिजे.

आनंद घ्या

उन्हाळाची सुट्टी म्हणजे विश्रांती आणि दिलखुलास वागण्याचे दुसरे नाव. परंतु मधुमेहामुळे असे करणे कठीण जाऊ शकते. पण जीवनशैलीशी निगडित या आजाराचे व्यवस्थापन करण्यासाठीच्या छोट्या-छोट्या उपाययोजना करुन या हवामान बदलाचा देखील मनमुराद आनंग घेऊ शकता.

डिहायड्रेशनची समस्या

मधुमेह असणाऱ्या लोकांना डिहायड्रेशनचा होण्याचा अधिक धोका असतो. कारण रक्तातील साखरेचे प्रमाण शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी करते. अधिक प्रमाणामध्ये द्रवपदार्थ घेऊन डिहायड्रेशनवर उपाय करू शकतो. खूप जास्त डिहायड्रेशन असेल तर, तुम्हाला अतिरिक्त आधारभूत सल्ला आहे की इलेक्ट्रोलाइट्स देऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *