बसचा ब्रेक फेल झाल्याने शहरात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
पुणे शहरात एन आय बी एम उंड्री रोडवर हा अपघात झाला आहे. एन आय बी एम उंड्री रोडवर उताराला एका बसचा ब्रेक फेल झाला. या बसने दुचाकी, रिक्षा आणि बीएमडब्ल्यू कारसह अनेक वाहनांना धडक दिली. यामुळे भीषण अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की,कोंढवा परिसरातील असणाऱ्या एनआयबीएम रस्त्यावर आज सायंकाळच्या सुमारास खासगी बस चालली होती. मात्र पुढे जात असताना या बसचा अचानक ब्रेक फेल झाला. त्यामुळे या बसने समोर असणाऱ्या वाहनांना जोरात धडक दिली. त्यामुळे वाहने एकमेकांना अचानकपणे जोरात धडकली. आणि एकमेकांवर जोरात आदळली. या अपघातात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. अन्य चार जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आणि त्यांनी वाहतूक सुरळीत केली.
जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा वर्दळीचा भाग आहे. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. वर्दळीच्या ठिकाणी हा अपघात झाल्याने एकच गोंधळ उडाला होता. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
