नवऱ्याच्या कलिगशी संबंध जुळले, 22 वर्षीय विवाहितेने प्रियकराच्या साथीने 33 वर्षीय पतीला संपवलं, ओढणीने जीव घेतला

स्वातंत्र्यदिन शांततेत पार पडावा, यासाठी शहरभर पोलिस बंदोबस्त असतानाच एमआयडीसी, गणेशपेठ आणि सदर भागात तीन हत्याकांडांनी उपराजधानी हादरली. क्षुल्लक वादातून एका इसमाची हत्या करण्यात आली. दुसऱ्या घटनेत पत्नीने पतीला संपविले. तर तिसऱ्या घटनेत एकाने भावाला ठार मारले.

प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या

अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. सुधीर महेंद्रप्रसाद द्विवेदी (वय ३३, रा. गजानननगर, हिंगणा रोड) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आशिषकुमार नरेशकुमार अग्निहोत्री (वय २९, रा. आनंद बुद्ध विहारजवळ, गजानननगर) याला अटक केली आहे.

पूजा सुधीर द्विवेदी (वय २२) ही फरार आहे. आशिषकुमार आणि सुधीर एमआयडीसीतील कंपनीत कामाला होते. ओळखीतून आशिषचे सुधीरच्या घरी येणे-जाणे सुरू झाले. याच काळात आशिष आणि पूजा यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. सुधीर अडसर ठरत असल्याने पूजा आणि आशिषने त्याच्या हत्येचा कट आखला.

दारु पाजून गळा आवळला

९ ऑगस्टला रात्री आशिष आणि सुधीर यांनी दारू प्यायली. त्यानंतर पूजा आणि आशिषने ओढणीने सुधीरचा गळा आवळून खून केला. बॉडी राजीवनगर भागात फेकून बाजूला दारूची बाटली ठेवण्यात आली. सुरुवातीला एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, शवविच्छेदन अहवालात गळा आवळून हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तपासाला वेग आला. आशिषला अटक करून चार दिवसांची पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *