काश्‍मीरमध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार, दोन जवान शहीद

काश्‍मीरमध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार, दोन जवान शहीद

जम्मू-काश्मीरमधील कुपवारा जिल्ह्यातील हंदवाडा येथे शुक्रवारी पहाटे भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. मात्र, या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत.

हंदवाडा भागातील लारीबल गावात काही दहशतवादी लपल्याची माहिती गुरुवारी रात्री भारतीय सैन्याला मिळाली होती. यानंतर जवान आणि पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरु केले. यावेळी झाचालदरा परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. यात सैन्याचे दोन जवान शहीद झाले. जवानांनी दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले. २१ राष्ट्रीय रायफल्सचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये अद्यापही चकमक सुरु असल्याचे समजते.

यापूर्वी दोन सप्टेंबरला बारामूल्लामध्ये राफियाबाद भागात झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला होता. त्याच्या दुसर्‍या दिवशी हंदवाडा येथे चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *