मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून दुष्काळग्रस्तांना एक कोटींची मदत

मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून दुष्काळग्रस्तांना एक कोटींची मदत

मुंबई क्रिकेट असोसिएशनने दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये एक कोटी रुपयांची देणगी देण्यात येणार आहे. एमसीए कार्यकारिणीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

२५ ऑक्टोबरला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये एक दिवसीय सामना होणार आहे. या सामन्यातून दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय एमसीएच्या कार्यकारिणीत घेण्यात आला. एमसीएचे उपाध्‍यक्ष आशिष शेलार यांनी ही माहिती दिली.

यावेळी दुष्काळग्रस्तांच्या मदतनिधीसाठी एखाद्या विशेष सामन्याचे आयोजन करावे, अशी सूचना ज्येष्ठ सदस्य रवी मांद्रेकर यांनी एमसीएला केली. त्या सूचनेवरही कार्यकारिणीत सकारात्मक चर्चा झाली असून विशेष सामन्याचे आयोजन करण्याबाबत पुढील बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *