मुंबईच्या वडाळ्यातील शास्त्रीनगर परिसरातील कोकरी आग्री चाळीत रहाणा-या तरुणावर त्याच्याच मित्राने गोळ्या झाडून ठार मारले.
गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास अर्जुन जयस्वाल उर्फ मुन्ना नावाच्या तरुणावर त्याचा मित्र दिनेश याने गोळ्या झाडल्या. अर्जुनला उपचारासाठी तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार दरम्यान त्याचा मृत्यु झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुनवर त्याचाच साथीदार दिनेश याने गोळ्या झाडल्या. अर्जुन आणि दिनेश एकमेकांना ओळखत होते. मात्र अर्जुनने त्याला का मारले हे अद्याप समजले नाही. ते दोघेही छोटा राजन टोळीशी संबंधित असल्याने या हल्ल्यामागे गँगवॉर असावे, असाही पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
