96 व्या वर्षी एम.ए.साठी प्रवेश

96 व्या वर्षी एम.ए.साठी प्रवेश

माणूस हा आजन्म विद्यार्थ्याच्या भूमिकेत असतो आणि शिक्षणाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील 96 वर्षांच्या एका आजोबांनी अर्थशास्त्र विषयात एम.ए. करण्यासाठी नोंदणी केली आहे.

पाटण्याच्या नालंदा विश्व विद्यापीठात राजकुमार वैश्य यांनी एमए साठी अर्ज दाखल केला आहे. बरेलीचे असलेले वैश्य आपल्या कुटुंबियांसमवेत पाटण्याच्या राजेंद्रनगरमध्ये राहतात. त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली असता त्यांच्या मुलाने नालंदा विद्यापीठात चौकशी केली.

सुमारे 20 वर्षांपूर्वी म्हणजे 77 व्या वर्षी त्यांना उच्चशिक्षण घेण्याची उर्मी जाणवली होती. संसारातील जबाबदाऱ्यांच्या नादात शिक्षण घेण्याची इच्छा अपुरी राहिली होती. मात्र आता हे स्वप्न साकार होणार आहे. विशेष म्हणजे विश्वविद्यालयाच्या अधिकाऱ्यांनी राजकुमार यांच्या घरी जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली.

राजकुमार वैश्य यांचा जन्म 1 एप्रिल 1920 रोजी झाला होता. बरेलीतील एका शाळेतून त्यांनी 1934 मॅट्रिक पास केलं. त्यानंतर 1938 साली आग्य्राच्या विश्वविद्यालयातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं. त्यानंतर झारखंडमध्ये त्यांना नोकरी मिळाली, लग्नही झालं.

1977 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर ते पुन्हा बरेलीला आले. दरम्यान पत्नीचं निधन झालं. इतरही काही कामांमध्ये ते व्यस्त होते, मात्र एम.ए. करण्याची इच्छा मनातून गेली नव्हती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *