जपानच्या भूमीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहेत. यावेळी कोयासान विद्यापीठात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करताना अत्यंत आनंद आणि अभिमान वाटत असल्याची भावना देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन व्यक्त केली आहे.

जपानच्या दौऱ्यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटनाला प्रोत्साहन आणि जपानमधल्या कंपन्यांना राज्यात गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *