उत्तर प्रदेशच्या पर्यटन विभागात कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी चेंबूरच्या टिळकनगर परिसरात घडली. याबाबत टिळकनगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे.
विमलेशकुमार ओदित्य (वय ५९) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. मंगळवारी ते आपल्या घरी असताना सकाळी आठच्या सुमारास त्यांनी दुसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. जखमी अवस्थेत त्यांना तत्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
