मुंबईतील कमलानगर येथील झोपडपट्टीत पहाटे ५च्या सुमारास भीषण आग लागली आहे. या आगीत मोठ्या प्रमाणात घरं जळून खाक झाली असून अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीचं कारणही अस्पष्ट आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
