‘नुक्कड’फेम अभिनेते जावेद खान अमरोही यांचे निधन

ऐंशीच्या दशकात ‘दूरदर्शन’वरील प्रसिध्द मालिका ‘नुक्कड’मधून घरोघरी लोकप्रिय झालेल्या कलकारांपैकी एक अभिनेते जावेद खान अमरोही यांचे मंगळवारी निधन झाले. ते ५० वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास सांताक्रुझ येथील दफनभूमीत दफन करण्यात येणार आहे.

जावेद खान यांना श्वसनाचा आजार होता. गेले वर्षभर ते अंथरुणाला खिळले होते. त्यांना सूर्या नर्सिंगनर्सिंग होम येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची दोन्ही फुफ्फुसे निकामी झाल्याने तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जावेद खान यांनी कित्येक लोकप्रिय मालिका आणि हिंदी चित्रपटातून भूमिका केल्या होत्या. एफटीआयआयमधून प्रशिक्षण घेऊन अभिनय क्षेत्रात उतरलेले जावेद खान ऐशीच्या दशकातील लोकप्रिय चरित्र कलाकारांपैकी एक होते. ‘अंदाज अपना अपना’, ‘लगान’, ‘इश्क’, ‘हम है राही प्यार के’, ‘चक दे इंडिया’ अशा कित्येक अलिकडच्या चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या होत्या. आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त आणि पूजा भट्ट यांची मुख्य भूमिका असलेला ‘सडक २’ हा जावेद खान यांचा कारकिर्दीतील अखेरचा चित्रपट ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *