“…तर मुंबई, लंडन, न्यूयॉर्कसारखी मोठी शहरं समुद्रात बुडतील”, संयुक्त राष्ट्रांचा इशारा

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी जगभरातील हवामान बदलाबाबत चिंता व्यक्त करत अनेक देशांना इशारा दिला आहे. अँटोनियो म्हणाले की, मुंबई आणि न्यूयॉर्कसारख्या शहरांना समुद्राच्या वाढणाऱ्या पातळीमुळे गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे जगभरातील देशांना हवामान बदलाच्या संकटाशी सामना करण्यासाठी जोरदार प्रयत्न करावे लागतील. समुद्राची वाढणाऱी पाणी पातळी आपलं भविष्य बुडवत आहे. हे आपल्यासमोरचं मोठं संकट आहे.

जगभरातली लहान बेटं, विकसनशील राज्ये आणि सखल भागांमध्ये राहणाऱ्या लाखो लोकांसाठी यूएन सुरक्षा परिषदेत ‘समुद्राच्या पातळीत वाढ – आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेसाठी उपाय’ यावर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान, गुटेरेस म्हणाले की, समुद्राच्या बातळीत वाढ होणं हे चिंतेचं कारण आहे. समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे अनेक शहरं, सखल भाग आणि अनेक देशांचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *