तळेगावच्या छोट्याश्या मैदानावर वैभव सूर्यवंशी गाळतोय घाम!

आयपीएलनंतर टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं मैदान गाजवणारा 15 वर्षांचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने आता रेड बॉल क्रिकेटकडे आपला मोर्चा वळवलेले आहे. व्हाईट बॉल क्रिकेटच्या टी20 फॉरमॅटमध्ये आपल्या जबरदस्त फलंदाजीने संपूर्ण जगाला आश्चर्यचकित करणारा वैभव आता रेड बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा आपली कमाल दाखवण्यासाठी सज्ज आहे. इंग्लंड दौऱ्यात वैभव सूर्यवंशीचे टी20 क्रिकेट फॉरमॅटमध्ये पदार्पण झाले. झिम्बाब्वे दौऱ्यानंतर थोडी विश्रांती घेऊन पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशी मैदानावर परतला असून तो सध्या गुरुवारपासून अमरावती मार्गावरील तळेगाव येथील राजस्थान संघाच्या अकॅडमीत रेड बॉलने सराव करत आहे.

येत्या 23 ऑगस्टपासून दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी वैभव सूर्यवंशीची ही तयारी सुरु आहे. अमरावती मार्गावरील तळेगाव येथील राजस्थान संघाची ही अकॅडमी ही बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सेलेन्स अकॅडमी सारखीच असून वैभव त्याच्या सहकाऱ्यांसोबत येथे सराव करत आहे.  काही दिवसांपूर्वी जेव्हा वैभव सूर्यवंशी हा टीम इंडियासोबत परदेश दौऱ्यावरून थेट नागपुरात दाखल झाला होता आणि झिम्बाब्वे दौऱ्याच्याआधीचा सराव आणि तयारी सुद्धा त्याने इथेच केलेली. त्यावेळी वैभवचे आईवडील आणि दोन्ही भाऊ त्यांना तळेगाव येथे भेटायला आले होते.

सदर शिबिरात तांत्रिक कौशल्य विकास, शारीरिक क्षमता वाढवणे, कामाचे व्यवस्थापन, विश्रांती, कामगिरी आणि विश्लेषण यांचा समावेश आहे. खेळ शारीरिकदृष्ट्या तयार, तांत्रिकदृष्ट्या परिष्कृत आणि देशांतर्गत सीजनच्या गरजांसाठी सज्ज होऊन खेळाडू स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परततील, असा यामागील उद्देश असल्याची राजस्थान रॉयल्सचे व्यवस्थापक भिंदर यांनी दिली.

आयपीएलमध्ये वैभवचं दमदार प्रदर्शन : 

आयपीएल 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीने संपूर्ण सीजनमध्ये 776 धावा केल्या. यासह त्याने सर्व दिग्गजांना बाजूला सारून ऑरेंज कॅप सुद्धा जिंकली. टी20 क्रिकेटमधील विस्फोटक फलंदाज अशी ओळख होत असताना वैभव सूर्यवंशीला आता टेस्ट क्रिकेट सुद्धा गाजवायचं आहे. राजस्थान रॉयल्सने आपल्या खेळाडूंसाठी तळेगाव येथे 10 दिवसांच्या शिबिराचं आयोजन केलं असून यात वैभव शिवाय संदीप शर्मा शुभम दुबे, तुषार देशपांडे आणि रवी सिंग हे खेळाडू सुद्धा आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *