फणफणत्या तापात एसी किंवा पंखा बंद करू नका : डॉक्टर

फणफणत्या तापात एसी किंवा पंखा बंद करू नका : डॉक्टर

फणफणता ताप  आपल्यावर साधारणपणे रुग्णाच्या अंगावर चादर टाकतात, पंखा बंद करतात, कुलर चालू देत नाही. एसी तर बिल्कुल बंद करतात, पण डॉक्टरांचे म्हणण आहे की तापाला कमी करण्यासाठी आणि बॉडीला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी सर्वाधिक फायदेशीर एसी चालू ठेवणे असते.

एसी चालू ठेवल्याने शरीराचे तापमान वाढत नाही. तसेच ताप नियंत्रणात राहतो. तसेच यामुळे शरिरातील पाणीही कमी होत नाही.  तापात डिडायड्रेशन हे एक समस्या असते. शरिरातील पाणी कमी होण्यापासून रोखले तर तापाचे इतर अवयवांवर होणारा परिणाम कमी होतो.

तापामध्ये शरिराला थंड ठेवण्यासाठी वरून थंड दिले पाहिजे. साधारणपणे तापामध्ये अनेक जण थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवतात, पण पंखा, कूलर आणि एसी बंद करतात.

बीएलके सुपर स्पॅशलिटी हॉस्पिटलच्या मेडिसीन डिपार्टमेंटचे डॉ. आर. के. सिंगल यांनी सांगितले की, हायड्रेशन थेरेपीच्या बेसमध्ये थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या जातात. त्यामुळे ताप असेल तर घरातील पंखे, कुलर किंवा एसी चालू ठेवाव्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *