‘आप’ नेते सोमनाथ भारती गोत्यात, पत्नीला मारहाण प्रकरणी गुन्हा

‘आप’ नेते सोमनाथ भारती गोत्यात, पत्नीला मारहाण प्रकरणी गुन्हा

आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती यांच्याविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पत्नी लिपिका मित्रा यांनी दिल्लीच्या द्वारका पोलिस ठाण्यात सोमनाथ यांच्याविरोधात तक्रार नोंदवली होती.

पाच वर्षांपासून सोमनाथ भारती छळ करतात असल्याचा आरोप पत्नी लिपिका यांनी तक्रारीत केला होता. सोमनाथ भारती यांचं 2010 साली लिपिका मित्रा यांच्यासोबत लग्न झालं होतं. मात्र लग्नानंतर वर्षभरात आपल्यासोबत मारहाण केल्याचा आरोप लिपिका मित्रांनी केला आहे.

‘मी शारीरिक, मानसिक, शाब्दिक हिंसाचाराचा बळी ठरले आहे,’ असा दावा लिपिका यांनी केला आहे. ‘मला आणि माझ्या मुलांना सोमनाथ त्रास देत असत. सोमनाथ आणि त्यांच्या समर्थकांच्या दहशतीत आम्ही काही काळ घालवत आहोत’ असंही त्या म्हणाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *