सुपरहॉट सनी लिऑन सुपरवुमनच्या भूमिकेत!

सुपरहॉट सनी लिऑन सुपरवुमनच्या भूमिकेत!

आतापर्यंत मोठ्या पडद्यावर बोल्ड सीन आणि किसिंग सीन देणारी बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिऑन लवकर स्टंट आणि अॅक्शन सिक्वेन्स करताना दिसेल. सनी लवकरच सुपरवुमनच्या अवतारात दिसणार आहे.

सनी आणि तिचा नवरा डॅनियल वेबर लवकरच नवीन प्रॉडक्शन हाऊस सुरु करण्याच्या तयारीत आहेत. या प्रॉडक्शन हाऊसच्या पहिल्या चित्रपटाचे चित्रीकरण ऑक्टोबरमध्ये सुरु होईल, असं डॅनियल वेबरने सांगितलं.

सनी आणि डॅनियलने सिनेमाच्या प्री पॉडक्शनचं काम पूर्ण केलं आहे. हा सिनेमा सुपरहीरो ड्रामा असून सनी त्यात सुपरवुमनच्या भूमिकेत दिसणार आहे. सुपरवुमन हा सनीचा ड्रीम रोल असल्याचं कळतं.

सनीच्या चाहत्यांनी तिला कधीही अशा भूमिकेत पाहिलेलं नाही, त्यामुळे मोठ्या पडद्यावर सुपरवुमन सनी पाहणं ही चाहत्यांसाठी जणू पर्वणीच ठरेल.

खरंतर लॉस एंजलिसमध्ये सनी आणि तिच्या पतीचं प्रॉडक्शन हाऊस आहे. पण भारतात नवीन नावाने आणि नव्या अंदाजात प्रॉडक्शन हाऊस सुरु करण्याचा दोघांचा इरादा आहे. या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत फक्त बॉलिवूड चित्रपट बनवण्यात येणार आहे.

याबाबत सनीने सांगितलं की, “चित्रपट तयार झाल्यानंतर यावर आधारित एक सुपरहीरो कॉमिक आणि सुपरहीरो टॉईज आम्ही तयार करणार आहेत. हे असं क्षेत्र आहे, जे बॉलिवूडमध्ये कधीच एक्सप्लोर झालेलं नाही, मला असं वाटतं.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *