गोरेगाच्या बिंबीसारनगरमध्ये एका अल्पवयीन मुलीचा शेजारी राहणाऱ्या तरूणानं विनयभंग केल्याची घटना घडली आहे. 15 वर्षीय अरबाज अन्सारी असं आरोपीचं नाव आहे.
पीडित मुलीच्या पालकांनी अरबाजच्या कुटुंबियांना जाब विचारला असता पीडित मुलीचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ सार्वजनिक करण्याची धमकी अरबाजने दिली. याप्रकरणी सोमवारी गोरेगावच्या वनराई पोलिसांत आरोपी अरबाज, अरमान, अमन आणि अस्मा अन्सारी यांच्याविरोधात पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणानंतर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही आणि त्यामुळेच आरोपीनं पुन्हा पीडित मुलीचा विनयभंग केला. यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी वेळेवर कारवाई न केल्यान दुसऱ्यांदा विनयभंग झाल्याचा तसेच पोलीस आरोपींना वाचवत असल्याचा आरोप पीडित मुलीने केला आहे.
