माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या गाडीला अपघात, रुग्णालयात दाखल

आताची मोठी बातमी समोर येत आहे. माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत  यांच्या गाडीला अपघात  झाला आहे. डंपरनं दीपक सावंत यांच्या कारला धडक दिली. डॉ. दीपक सावंत आज सकाळी पालघरला जाण्यासाठी निघाले होते. यावेळी काशिमीरा भागात त्यांच्या कारला डंपरने धडक दिली. या अपघातात सावंत यांच्या मानेला आणि पाठिला दुखापत झाली असून त्यांच्या कारचंही मोठं नुकसान झालं आहे. डॉ. सावंत यांना अॅब्युलन्सने अंधेरीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *