मुलुंड आणि ठाण्यातील नागरिकांना आजपासून प्रक्रियेशिवाय पाणीपुरवठा, पाणी गाळून व उकळून पिण्याचे आवाहन

मुलुंड आणि ठाण्यातील काही भागांतील नागरिकांना २० जानेवारीपासून पुढचे काही दिवस शुद्धीकरण प्रक्रिया न केलेल्या पाण्याचा पुरवठा होणार आहे. ठाणे जिल्ह्यातून जल शुद्धीकरणासाठी पाणी वाहून नेण्यात येणाऱ्या भूमिगत जलबोगद्याला ठाणे विभागात कूपनलिकेचे काम सुरू असताना हानी झाली आहे. या जलबोगद्याची दुरुस्ती शुक्रवारपासून हाती घेण्यात येणार आहे.

ठाणे जिल्ह्यातून जलबोगद्याद्वारे मुंबईत आणले जाणारे पाणी आधी भांडुप येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात नेले जाते. मात्र, जल शुद्धीकरणासाठी पाणी वाहून नेण्यात येणाऱ्या भूमिगत जलबोगद्याला ठाणे विभागात कूपनलिकेचे काम सुरू असताना हानी झाली आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठी शुक्रवार, २० जानेवारीपासून हा जलबोगदा बंद करावा लागणार आहे. या कारणास्तव भांडुप संकुलापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी जुन्या वितरण व्यवस्थेचा वापर करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *