106 व्या वर्षी आजीला आले दुधाचे दात; पाळणा फुलांनी सजला, घरच्यांचं पाळण्यात बसवून सेलिब्रेशन!

106 वर्षांच्या आजीला पुन्हा आले दात, घरच्यांनी पाळण्यात बसवून सेलिब्रेशन केलं. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातल्या चपळगाव येथील धानव्वा उटगे असं या आजीचं नाव आहे. आजीला टोपी आणि फुलांचा हार घालून लहान मुलाप्रमाणे जो बाळा जो जो रे म्हणत चक्क बारशाचा कार्यक्रम केला. यावेळी आजीला सर्वांनी उचलून हळुवारपणे पाळण्यात बसवले आणि पाळण्याला झोके दिले. खापर पतवडं, पतवंड, नातवंडं, मुलं आणि सुना अशा आजींच्या कुटुंबातील तब्बल 80 जणांनी मिळून हा कार्यक्रम साजरा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *