साऊथ इंडस्ट्रीमधून (South Actress) एक दुख:द बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि पद्मश्री पुरस्कार विजेत्या सौकार जानकी (Sowcar Janaki) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्या वृद्धापकाळातील आजारामुळे त्रस्त होत्या. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सौकार जानकी यांना तातडीने चेन्नईच्या कावेरी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते (Entertainment). परंतु, त्यांची प्राणज्योत मालवली. अभिनेता नासर यांनी सौकार जानकी यांच्या निधनाची बातमी दिली. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच्या सौकार जानकी यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. तसेच दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीलाही मोठा धक्का बसला.
अभिनेत्री सौकार जानकी यांचं निधन झालं असल्याची बातमीने सिनेसृष्टीवर शोककळा
अभिनेता नासर यांनी सांगितलं की, सौकार जानकी यांचं निधन झालं आहे. त्यांची वारंवार प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे सौकार जानकी यांना तातडीने कावेरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचा आयसीयूमध्ये वैद्यकीय देखरेखेखाली ठेवण्यात आले होते. अनेक दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु, अनेक दिवसांच्या उपचारानंतर शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली. दुपारी 1:59 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असल्याची माहिती आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री सौकार जानकी यांचा जन्म आंध्र प्रदेशाकील राजमुंद्री येथे एका कन्नड भाषिक कुटुंबात झाला. सौकार जानकी यांच्या कुटुंबाने त्यांचे लग्न लहान वयातच लावून दिले होते. त्यांचे लहान वयातच श्रीनिवास राव यांच्याशी झाले होते. गरोदरपणात त्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. यानंतर सौकार जानकी यांनी आसाम गुवाहाटी युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशनचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. सौकार जानकी यांनी यानंतर आकाशवाणी मद्रास (ऑल इंडिया रेडिओ) येथे रेडिओ जॉकी म्हणून काम केलं होतं. यानंतर त्यांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं.
सौकार जानकी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात 1950 साली एल.व्ही प्रसाद दिग्दर्शित ‘शावुकारु’ या तेलुगु सिनेमाद्वारे केली. यानंतर त्यांनी 1952 साली त्यांनी टी.आर सुंदरम यांच्या ‘वलयापती’ या तामिळ सिनेमातून तामिळ सिनेसृष्टीत पदार्पण केलं. सौकार जानकी यांनी आपल्या कारकिर्दीत तेलुगु, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेतील सिनेमांमध्ये काम केलं. सिनेमांसह त्यांनी टिव्ही मालिकांमध्ये काम केलं. आपल्या उत्कृष्ट सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.

