ट्रॅक्टर कालव्यात कोसळून पाच जणांचा मृत्यू

ऊसतोड कामगारांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर-ट्रॉली तालुक्यातील करकंब येथील उजनी डाव्या कालव्यात कोसळून मंगळवारी रात्री झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन बालकांसह तीन कामगारांचा समावेश आहे. तीन जण जखमी झाले आहेत. तालुक्यातील करकंब येथे मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधून हे ऊसतोड कामगार घरी ठिकाणी निघाले होते.

या वेळी ट्रॅक्टर उजनी डाव्या कालव्यात कोसळला. ट्रॉली पूर्ण उलटून त्याखाली सर्व कामगार अडकले होते. आजूबाजूच्या नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. याबाबतची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने जेसीबीच्या साहाय्याने ट्रॉली बाजूला करून सर्वाना करकंब ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, अरविंद राजाराम कदछे (२), प्रिया नवलसिंह आर्या (२), सुरीका विरसिंग डावर (१६), मकबाई नवलसिंग आर्या (२३, सर्व जण राहणार कोलके, ता.वरला, जि. बडवाणी, मध्य  प्रदेश) यांना उपचारापूर्वीच मृत घोषित करण्यात आले.

P

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *