आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी धारावीची ओळख आहे. मागील अनेक वर्षांपासून धारावीच्या पुनर्विकास रखडला आहे. शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात येताच धारावी पुनर्विकास प्रकल्पालागती मिळाली आहे. लवकरच हा प्रकल्प मार्गी लागणार आहे. देसातील सर्वात मोठा उद्योग समूह असलेला अदानी ग्रुप धारावीचा पुनर्विकास करणार आहे. कंत्राट दाराच्या शर्यतीत अदानी ग्रुप आघाडीवर आहे.
तीन बड्या कंपन्या धारावीच्या पुनर्विकास प्रक्रियेत सहभागी
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीच्या पुनर्विकासासाठी अदानी समूह इच्छुक आहे. अदानी समुहासह नमन ग्रुप आणि डीएलएफ कंपनी या तिघा बड्या विकासकांनी धारावीच्या पुनर्विकास निविदा प्रक्रियेत भाग घेतल्याची माहिती एमएमआरडीए आयुक्त श्रीनिवासन यांनी दिलीय.
23 हजार कोटींचा धारावी पुनर्विकास प्रकल्प
धारावी पुनर्विकास प्रकल्प हा तब्बल 23 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. 600 एकरावर पसरलेल्या धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचं कंत्राट कुणाला मिळणार, याकडं आता सगळ्यांचं लक्ष लागल आहे.
