थंडीचा गैरफायदा घेत पहाटे सुरू होता धक्कादायक प्रकार, कार उघडताच पोलीस हादरले…

हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे मामा चौक भागात भल्या पहाटे थंडीचा गैरफायदा घेत धाकडायक प्रकार सुरू असल्याचं समोर आलं आहे. इथे गुटखा वाहतुक करणाऱ्यांचे मनसुबे पोलीसांनी उधळून लावले असून आज पहाटे साडेचार वाजता पोलीसांनी छापा टाकून एका कारसह १.३५ लाख रूपयांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी एका व्यक्तीविरुध्द वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसमत इथे काल सकाळी साडेचार वाजताच एका कारमधून गुटखा येत अल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम, उपनिरीक्षक बाबासाहेब खार्डे, जमादार भगीरथ सवंडकर, प्रशांत मुंडे यांच्या पथकाने मामा चौकात जाऊन कार चालक नवीनदखान पठाण याची चौकशी सुरु केली. मात्र, पोलिसांच्या प्रश्‍नाचे तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. त्यामुळे पोलीसांनी कारमधील पोत्यांची तपासणी केली असता त्यात प्रिमीयम राजनिवास पानमसाला, केसरयुक्त वजीर, जाफरानी जर्दाचे पोते आढळून आले.
पोलिसांनी गुटखा व कार ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक खार्डे यांच्या तक्रारीवरून नवीदखान इसाखान पठाण (रा. वसमत) याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तर पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *