मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती मिळतेय. पोलादपूरजपळच्या कशेडी घाटाच्या सुरुवातीला हा अपघात झाला. वाळूने भरलेला एक ट्रक बाजूने जाणाऱ्या रिक्षावर उलटला. या रिक्षात चार प्रवासी होते. त्यात तीन शाळकरी विद्यार्थी असल्याची माहिती आहे.
रिक्षातील सर्व प्रवासी माणगाव तालुक्यातील गोरेगाव इथले रहिवासी आहेत. विद्यार्थी खेड इथून परीक्षा देऊन रिक्षाकने घरी परतत होते. यावेळी वाळूने भरलेला ट्रक रिक्षावर उलटला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.
क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला करण्याचं कम सुरु करण्यातआलं असून एक मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.
