राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ रुग्णालयात दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ रुग्णालयात दाखल झाले आहेत. छगन भुजबळ यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. व्हायरल इंफेक्शनमुळे त्यांना रुग्णालयात ते दाखल झाले असल्याची माहिती मिळत आहे. आज संध्याकाळीच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रकृतीच्या कारणास्तव ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना आज (सोमवार) डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल इंफेक्शन झाल्यानंतर भुजबळ यांनी घऱगुती उपचार केले होते. यानंतर त्यांनी पक्षाच्या शिर्डी येथील शिबीरालाही उपस्थिती लावली होती. मात्र सोमवारी सकाळी त्रास वाढल्याने ते बॉम्बे रुग्णालयात दाखल झाले आहेत. आज संध्याकाळीच त्यांना डिस्चार्ज दिला जाण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *