राज्यात थंडीचा तडाखा वाढला; महाबळेश्वरच्या तापमानानं वळवल्या नजरा….

देशाच्या (Cold wave in northern india) उत्तर भागात थंडीनं चांगलाच जम बसवल्याचं पाहायला मिळत आहे. हिमाचल प्रदेश (hindustan times), उत्तराखंड (Uttarakhand) आणि जम्मू काश्मीरच्या (Jammu kashmir) बहुतांश भागांमध्ये बोचरी थंडी जाणवू लागली असून, काही भागांमध्ये हिमवृष्टीलाही सुरुवात झाली आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये आलेल्या या थंडीच्या लाटेचे परिणाम महाराष्ट्रातही जाणवू लागले आहेत. पुणे (Pune) , सातारा (satara) या भागांमध्ये तापमानात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई (Mumbai), नवी मुंबई (Navi Mumbai) भागातही रात्रीच्या तापमानात

रविवारी पुण्यामध्ये तापमान 12.7 अंश इतकं होतं. तर, सोमवारी तापमानाचा हाच आकडा निफाडमध्ये (Niphad temprature) 11.8 अंशावर पोहोचला आहे. देशात्या उत्तर भागांतील बहुतांश राज्यांमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे मध्यप्रदेशसह महाराष्ट्रातही पारा उतरला आहे.

विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह कोकण (Konkan) आणि गोव्यातही (Goa) थंडीला सुरुवात झाली. आंबोली घाट परिसरात किमान तापमान 17 अंश, तर कोल्हापूरातही किमान कापमान 17 अंश सेल्सिअस इतकं असेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला.

हवेत असणारा आल्हाददायक गारवा, सकाळच्या वेळेत रस्त्यांवर दरीतून येणारं धुकं आणि एकंदर वातावरण पाहता महाबळेश्वरच्या दिशेनं येणाऱ्यांची संख्या येत्या दिवसांमध्ये वाढणार आहे.

साथीच्या रोगांचा धोका

सकाळच्या वेळेत असणारं कडाक्याचं ऊन आणि संध्याकाळच्या वेळेत तापमानात होणारी घट पाहता साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असल्यामुळं त्या धर्तीवरही काळजी घेतली जाणं गरजेचं आहे. (Corona) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असणाऱ्या नियमांमध्ये आलेल्या शिथिलतेमुळे नागरिकांनी बेजबाबरादपणे वागू नये असं आव्हान आरोग्य विभागाकडून करण्यात येतंय. बदलत्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांची काळजी घेण्याचा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *