धावत्या लोकलमध्ये तरुणाची हत्या झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

कल्याण रेल्वे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

अंधेरी बोरिवली दरम्यान धावत्या लोकल ट्रेनमध्ये किरकोळ वादातून 22 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याच्या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी संपूर्ण उपनगरी रेल्वे मार्गावर सतर्कता वाढवली आहे. कल्याण रेल्वे पोलीस देखील ऍक्टिव्ह मोडवर आले असून कल्याण रेल्वे स्थानकावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे .कल्याण रेल्वे पोलिसांनी तातडीने सुरक्षा उपाययोजना वाढवल्या आहेत.  कल्याण रेल्वे स्थानकावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संशयित प्रवाशांची झडती घेतली जात आहे. प्लॅटफॉर्म, प्रवेशद्वार आणि लोकल ट्रेनमध्येही पोलिसांकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.

लोकल ट्रेनच्याचा दरवाजात उभं राहणाऱ्यांवर दंडात्मक कारावई

लोकलचा दरवाजा अडवून उभं आता महागात पडतंय.  प्रवाशांच्या सुरक्षिततेला बाधा ठरणारे फेरीवाले, लोकलच्या दरवाजात अडथळा निर्माण करणारे प्रवासी तसेच रेल्वे परिसरात अनधिकृतपणे वावरणा-या व्यक्तिंविरोधात आरपीएफने धडक मोहिम सुरू केलीय. जानेवारी ते जून या सहिन्यांत नियमाचं उल्लंघन केलेल्या 15 हजार 589 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 40 लाखांचा दंड वसूल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *