वृद्ध महिलेचा दागिन्यांसाठी खून करून मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकला

संगमेश्वर तालुक्यातील  देवरुख येथील क्रांतीनगर परिसरात असलेल्या अपार्टमेंटमध्ये शारदा दत्तात्रय संसारे या सुमारे ऐशी वर्षांच्या वृध्द महिलेचा दागिन्यांसाठी खून झाल्याचे उघडकीस आले आहे. इमारतीच्या गच्चीवर पाण्याच्या टाकीत सोमवारी रात्री या महिलेचा मृतदेह आढळून आला.अंगावरील दागिन्यांची चोरी करण्याच्या हेतूने हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज देवरुख पोलीसांनी व्यक्त केला. मुलगा दीपक संसारे याच्यासह शारदा संसारे या अपार्टमेंटमध्ये राहत होत्या. दीपक सोमवारी सकाळी ९.३० वाजता कामासाठी घराबाहेर पडले .

दुपारी ते घरी परतले तेव्हा घराला कुलुप होते. दीपक यांनी आईशी संपर्क करण्याचा प्रय केला असता प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी सहकाऱ्याच्या मदतीने कुलुप तोडले. पण शारदा संसारे घरात नव्हत्या. संध्याकाळपर्यंत दिपक यांनी आईचा शोध घेतला. रात्री घरातील न्हाणीघरात ते हात—पाय धुण्यासाठी गेले असता लालसर रंगाचे पाणी नळातून आल्यामुळे दिपक यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मित्रांसह त्यांनी सहकार्?याच्या गच्चीवर जाऊन पाण्याच्या टाकीमध्ये पाहिले असता शारदा यांचा मृतदेह दिसून आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *