पुण्यातील माजी आमदाराचं हृदयविकाराच्या झटक्याने दुख:द निधन!

पुण्यातील शिवाजीनगर मतदार संघाचे माजी आमदार विनायक (आबा) निम्हण यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. सलग तीनवेळा शिवाजीनगर मतदारसंघातून 1999 ते 2014 अशी 15 वर्षे निवडून आले होते. दोनवेळा शिवसेनेतून तर एक टर्म काँग्रेसमधून त्यांनी विजय मिळवला होता. त्यांच्यावर रात्री नऊ वाजता पाषाण स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती समजत आहे.

भाजप नेते नारायण राणे यांनी शिवेसेनेमधून बाहेर पडत बंड केलं होतं. त्यावेळी विनायक निम्हण यांनीही शिवसेना सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. परत 2014 साली पुन्हा एकदा निम्हण यांनी शिवबंधन बांधत शिवसेनेमध्ये घरवापसी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *