अंदाधुंद गोळीबारात महापौरांसह 18 जणांचा जागीच मृत्यू

अमेरिकेत गोळीबाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. आता अमेरिकेतील मेक्सिकोच्या मेक्सिकन सिटी  हॉलमधून मोठी बातमी समोर येत आहे. येथील सिटी हॉलमध्ये सामूहिक गोळीबार झाला असून त्यात किमान 18 जणांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार मृतांमध्ये महापौरांचाही  समावेश आहे. मेक्सिकोमध्ये ही घटना बुधवारी घडली.

संपूर्ण परिसरात घबराट

परदेशी मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेक्सिकन सिटी हॉलमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अचानक एक अज्ञात व्यक्ती कार्यक्रमात शिरते आणि अंदाधुंद गोळीबार करू लागतो. या गोळीबारात 10 जण जागीच ठार झाले. तिथल्या महापौरांशिवाय त्यांचे वडील, माजी महापौर आणि महापालिका पोलिसातील अनेक अधिकाऱ्यांचा मृतांमध्ये समावेश आहे. त्याचबरोबर गोळीबाराच्या या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *