अश्लील चॅटिंग करणाऱ्या कॉल सेंटरवर कारवाई; १७ तरुणींची सुटका

अश्लील चॅटिंग करून तरुणांकडून पैसे उकळणाऱ्या कॉल सेंटरवर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मालाडमध्ये कारवाई केली. याप्रकरणी कॉल सेंटरचा मालक ब्रिजेश दयाशंकर शर्मा ऊर्फ शॉन विल्यम याला पोलिसांनी अटक केली.

या कारवाईत पोलिसांनी १७ तरुणींची सुटका केली असून या तरुणींच्या माध्यमातून कॉल सेंटर सुरू असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. मालाडमधील काचपाडा परिसरात हे कॉल सेंटर होते. प्रभारी पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण व त्यांच्या पथकाने या कॉल सेंटरमध्ये छापा मारला. यावेळी बारा तरुणींसह तिथे काम करणाऱ्या पाच तरुणी अशा सतरा तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले. चामेट या अ‍ॅपद्वारे त्या सर्वजणी विविध पुरुषांशी अश्लील संभाषण करीत होत्या.

या अ‍ॅपवर नोंदणी केल्यानंतर नागरिकांना मोफत चॅटिंग आहे, असे भासविले जात होते. नोंदणी केल्यानंतर चॅटिंगच्या नावाने संबंधित व्यक्तीकडून पैसे उकळले जात होते. पीडित मुलींनाही अश्लील चॅट करण्यास भाग पाडले जात होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *