भाऊ-बहिणीचं नातं पवित्र मानलं जातं, मात्र काही समाजकंटकांनी या नात्याला काळीमा फासल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पश्चिम बिहारमधील (West Bihar) चंपारणमधून हे प्रकरण समोर आलं आहे. तक्रार करण्यासाठी पीडित तरूणी सर्व प्रकार पोलिसांना सांगत होती तेव्हा पोलिसांनाही धक्का बसला.
नेमकं काय आहे प्रकरण?
मोहरमच्या दिवशी सर्व लोक जत्रा पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी पीडित घरी एकटीच होती. ती घरामध्ये अंघोळ करत असताना नराधम भावांनी भिंतीवरून उडी मारत घरात प्रवेश केला. मात्र पीडितेला याबाबत पुसटशीही कल्पना नव्हती, याचाच फायदा घेत आरोपी भावांनी 15 वर्षाच्या चुलत बहिणीचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ शुट केला.
व्हिडीओ शुट करत त्यांनी तिला व्हिडीओ फेसबुकवर टाकायची आणि जिवंत मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर दोन्ही भाऊ फरार झाले होते. पीडितेने शिकारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांना दोन भावांमधील एका आरोपीला पकडलं आहे. मोहम्मद फैज आणि मोहम्मद राजन असं दोन नराधम भावांचं नाव आहे.
याआधीही केला होता बलात्कार
काही दिवसांपूर्वी एका भावाने जबरदस्तीने पीडितेवर बलात्कार केला होता. मात्र त्यावेळी प्रकरण पंचायतीच्या माध्यमातून मिटवण्यात आल्याची माहिती पीडितेने पोलिसांना दिली.
