मेळघाटात तीन महिन्यांत ५३ बालमृत्यू; अनेक योजना राबवूनही अपयश

बाल आणि माता आरोग्यासंबंधी शासनाच्या पातळीवर सुमारे डझनभर योजना राबवण्यात येत असूनही मेळघाटात कोवळी पानगळ सुरूच असून एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत शून्य ते सहा वर्ष वयोगटातील ५३ बालकांचा मृत्यू झाला. शिवाय १९ अर्भक मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आहे.

आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, धारणी आणि चिखलदरा तालुक्यात एप्रिल ते जून २०२२ या कालावधीत १४५२ बालकांचा जन्म झाला. त्यापैकी शून्य ते सहा वर्षे वयोगटातील ५३ बालके दगावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *