दैनिक सामनाच्या मुख्य संपादकपदाची धुरा पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवण्यत आली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्य संपादकपदाची धुरा रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आली होती.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा सामनाच्या मुख्य संपादकपदाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
