हार्दिक पटेल निवडणूक लढणार ,भाजपला धडा शिकवणार?

हार्दिक पटेल निवडणूक लढणार  ,भाजपला धडा शिकवणार?

पाटीदार पटेलांसाठी आरक्षणाच्या मुद्द्यावरून गुजरातमध्ये आंदोलन करणाऱ्या हार्दिक पटेलचं लक्ष्य निश्चित आहे. भाजपला धडा शिकवण्याच्या उद्देशाने हार्दिक पटेलने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उतरण्याची तयारी केल्याचे पटेल लॉबीकडून सांगण्यात येत आहे.

अहमदाबाद आणि सूरत येथे पाटीदार अनामत आंदोलन समिती आणि सरदार पटेल समूह आतापासूनच लोकांना या प्रक्रियेत जोडण्यासाठी काम करू लागले आहेत. यासोबतच पटेलांनी नडियाद आणि आणंद येथील पक्षांना समर्थन देण्यावरही विचार मंथन सुरू केले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार गुजरातच्या अन्य विभागांमध्ये हे पक्ष निवडणूक लढवतील. पाटीदार समाजाच्या एका नेत्यांने सांगितले की, आम्ही पराभूत झालो तरी परवा नाही, पण भाजपच्या स्वप्नांवर नक्की पाणी फिरवू.

आम्हाला राजकीय पक्ष काढायचा नव्हता पण अहमदाबाद येथे ज्यापद्धतीने पोलिसांनी आमच्यावर अत्याचार केले त्यावरून आम्ही निवडणुकांमध्ये भाग घेण्याचे ठरवले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अहमदाबादमध्ये ४८ वॉर्डांमध्ये पटेलांची संख्या १२ इतकी सीमीत आहे. अहमदाबाद स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १९२ सदस्यांमध्ये ३८ काँग्रेस आणि दोन अपक्ष नेते आहेत. सूरतमध्ये पटेलांनी निश्चय केला आहे की, यंदा ‘भगव्या ब्रिगेड’ला यंदा धडा शिकवायचाच.

रविवारी नाडियाद आणि आणंद येथील पटेलांच्या नेत्यांनी घोषणा दिली आहे की त्यांची योजना भारतीय राष्ट्रयवादी पक्षातून निवडणूक लढवण्याची आहे. या पक्षाची स्थापना २००३ मध्ये करण्यात आली होती, तेव्हापासून हा पक्ष निवडणुकांमध्ये उतरत आहे.

राज्य सरकारकडून पटेलांना मुद्दाम लक्ष्य केले जात आहे. ज्या विरोधात लढणे आवश्यक असून ही लढाई बराच काळ सुरू राहील, अशा शब्दात आणंदच्या दिनेश पटेल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *