102 वर्षीय महिलेने बकऱ्या विकून बांधलं शौचालय

प्रातर्विधींसाठी महिलांना उघड्यावर जावं लागल्यामुळे अनेकांवर नामुष्कीची वेळ येते. शौचालय नसल्यामुळे सासरी जाण्यास नकार देणाऱ्या तरुणीची घटना ताजी असतानाच छत्तीसगडमधल्या 102 वर्षांच्या महिलेने बकऱ्या विकल्याचं वृत्त आहे.

उघड्यावर शौचाला जाण्याची वेळ येऊ नये म्हणू नये म्हणून कुवारबाई यादव नावाच्या महिलेने तिच्या बकऱ्यांची विक्री केली. तब्बल 22 हजार रुपयांना त्यांनी बकऱ्या विकल्या आणि शौचालय बांधलं. कुवारबाई यांच्यापासून प्रेरणा घेत गावातील इतरांनीही घरात शौचालय बांधायला सुरुवात केली. अशाप्रकारे गावात तब्बल 450 नवी शौचालयं बांधण्यात आली.

विशेष म्हणजे प्रशासनानेही महिलेला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. मनरेगाशी जोडून या मोहिमेला सरकारी अनुदान देण्याची तजवीजही करण्यात आली आहे. त्यामुळे एकप्रकारे पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानाला यश येत असल्याचं म्हटलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *