पत्नी नांदायला येत नसल्याने पतीचा विजेच्या खांबावर चढून आत्महत्येचा प्रयत्न

पत्नी नांदायला येत नसल्याच्या नैराश्येतून पतीने चक्क वीज वाहक खांबावर चढून आत्महत्येचा प्रयत्न तासगावमध्ये केल्याची घटना काल (बुधवार) रात्री घडली. सुमारे अर्धा तास सुरु असलेल्या या विद्युत खांबावरील सर्कसमुळे मार्गावरील वाहतुकही खोळंबली होती.

सांगली जिल्ह्यातील तासगाव शहरातील चिंचणी नाक्यात एका युवकांने विजेच्या खांबावर चढून तारांशी छेडछाड करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

 प्रशांत केशव माळी राहणार गोटेवाडी रोड तासगाव असे या युवकाचे नाव असून, बायको नांदायला येत नसल्याच्या नैराश्यातून त्याने हे प्राणघातक कृत्य केल्याची माहिती मिळाली आहे. तो खांबावर चढत असतानाच अनेक लोकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने न ऐकल्याने लोकांनी वीज प्रवाह बंद केला.

तो तसाच खांबाच्या एकदम टोकावर जाऊन तारांशी छेडछाड करू लागल्याने लोकांनी त्याला खाली घेण्याचा प्रयत्न केला. परंतु तो किमान अर्धा तास तरी या तारांशी खेळत होता. उपस्थित लोकांनी प्रसंगावधान राहून वीज प्रवाह बंद केला त्यामुळेच त्याचे प्राण वाचलेत. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *