वाढदिवशीच 2 वर्षांच्या बालकाचा करूण अंत

अतिशय वाईट आणि काळीज पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. वाढदिवशीच अवघ्या 2 वर्षाच्या चिमुरड्याचा दुर्देवी मृत्यू झालाय. यामुळे आसपासच्या परिसरात एकच शोककळा पसरली आहे. हा सर्व प्रकार लोणावळ्यात घडलाय.

शिक्रापूरमधील पवार कुटुंबिय आपल्या जुळ्या मुलांचं वाढदिवस साजरा करण्यासाठी लोणावळ्याला आले. लोणावळ्यात तुंगार्ली परिसरातील पुष्पा व्हिला इथे पवार कुटुंबियांनी घरातील लाडक्या जुळ्या मुलांच्या वाढदिवसाची जय्यत तयारी केली. या तयारीदरम्यान या जुळ्या मुलांपैकी एक मुलगा इतरांची नजर चुकवून व्हिलातील स्विमिंग पूलच्या दिशेने गेला. दुसऱ्या बाजूला वाढदिवसाठी तयारी सुरुवात होती, त्यामुळे कुटुंबियांचं लक्ष राहिलं नाही.

हा चिमुकला स्विमिंग पूलच्या दिशेनं गेला आणि पाण्यात बुडून त्याचा करूण अंत झाला. पाण्यात पडल्यानंतर जीव वाचवण्यासाठी या चिमुकल्याची धडपड सुरू होती. मात्र दुदैवानं आसपास कुणीच नव्हतं.

शिवबा कुठेच दिसत नसल्याने त्याचे कुटुंबीय स्विमिंग पूलजवळ आले. तेव्हा त्यांनी त्याला बाहेर काढलं. मात्र तोपर्यंत या चिमुकल्यावर काळानं घाला घातला होता. या घटनेनं पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. आपल्या मुलाकडे दुर्लक्ष करण्याची छोटीशी चूक दोन वर्षांच्या चिमुकल्याच्या जिवावर बेतलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *