सिंहगड रस्त्यावर खाऊ गल्लीत सिलिंडरचा स्फोट

सिंहगड रस्ता, माणिकबाग, गोयलगंगा येथील खाऊ गल्लीमधील ‘प्रेमाचा चहा’ या अमृततुल्यमधे आग लागून सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले. जवानांनी आग आटोक्यात आणली.या घटनेत हॉटेलचे मोठे नुकसान झाले असून कोणीही जखमी झाले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *