राज्यातील रुग्णवाढ कायम असून, आज सलग तिसऱ्या दिवशी ४ हजारांहून अधिक नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. आज राज्यात ४ हजार १६५ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. याशिवाय, तीन मृत्यूची नोंद देखील झाली आहे. याशिवाय राज्यात सध्या उपचाराधीन रुग्णांची संख्या २१ हजारांच्या घरात गेली आहे.
एकट्या मुंबईत आज दिवसभरात २ हजार २५५ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. तर, १३ हजार ३०४ अॅक्टिव्ह केसेस आहेत. राज्यात गुरुवारी ४ हजार २५५ आणि बुधवारी ४ हजार २४ नवीन करोनाबाधित आढळून आले होते. सलग तिसऱ्या दिवशी नवीन करोनाबाधितांची संख्या चार हजारांच्या पुढे आढळून आल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढताना दिसत आहे.
