ट्रिपल मर्डरने महाराष्ट्र हादरला! घरात आईचा खून तर दोन मुलांना विहिरीत ढकललं

साताऱ्यामध्ये ट्रिपल मर्डरचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथे आईचा गळा दाबून खून केल्यानंतर दोन मुलांनाही विहिरीमध्ये ढकलून त्यांचा खून केल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरेगाव तालुक्यातील वेलंग शिरंबे येथील विवाहिता योगिता दत्ता नामदास (वय ३८) हिचा अनैतिक संबंधाच्या संशयातून प्रियकराकडून गळा दाबून खून करण्यात आला. तर यानंतर भयंकर म्हणजे तिच्या दोन मुलांनाही विहिरीत ढकलून त्यांचाही खून करण्यात आला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.

दत्ता नारायण नामदास असं आरोपीचं नाव असून ते तो मूळचा राजे बोरगाव ता. जि. उस्मानाबादचा आहे. सध्या तो वेलंग शिरंबे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा इथं राहत होता. या घटनेनंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून कसून चौकशी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *