हिलेची हत्या केल्यानंतर पोलिसानं 24 तास फिरवला मृतदेह; पुढे जे घडलं त्यानं चक्रावून जाल

एका पोलिसानेच महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये समोर आली आहे. याहून गंभीर प्रकार म्हणजे या महिलेचा मृतदेह तब्बल 24 तास आरोपी गाडीत फिरवत होता.

औरंगाबाद येथील राहणाऱ्या आशा मोरे या महिलेने उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल सचिन खाजेकर याला व्याजाने पैसे दिले होते. तसेच या दोघांचे अनैतिक संबंधही होते. आशाने काही दिवसांपासून व्याजाने दिलेले पैशासाठी सचिनकडे तगादा लावला होता. तसेच ती सचिन सोबत राहण्यासाठी ही मागे लागली होती.

यावरून दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते. दोन दिवसांपूर्वी अशा ही आपले पैसे वसुलीसाठी उल्हासनगर येथे सचिन खाजेकरकडे आली होती. मात्र सचिन ने तिला पैसे देण्याच्या बहाण्याने उल्हासनगरचा कैलास कॉलनी येथे बोलवलं आणि तिची गाडीतच गळा दाबून हत्या केली.

महिलेच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सचिनने गाडीतच मृतदेह ठेऊन नाशिक, भिवंडी येथे फिरत राहिला. मात्र त्याला कुठेही मृतदेहाची विल्हेवाट लावता न आल्याने तो परत उल्हासनगरमध्ये आला. त्यानंतर सचिनने  त्याचा मेहुणा कल्पेश याला एमआयडीसी रोडवरील मिरची धाबा येथे बोलवलं.

मात्र पोलिसांच्या गुप्त सूत्रांकडून त्यांना या घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी मिरची धाब्यावर धाड़ टाकून सचिन आणि कल्पेश या दोघांना ताब्यात घेतलं असून या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

हिल लाईन पोलिसांनी सचिन वन हत्येचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर एच ढेरे करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *