पंतप्रधानांचा देहू दौरा; मोदी बनणार वारकरी, माथी सजणार तुकारामांची पगडी

देहू संस्थांनच्या विश्वस्तांच्या विनंतीनुसार पुण्यातील सुप्रसिद्ध मुरूडकर झेंडेवाले यांच्या कलावर्कशॉपमध्ये दोन तुकाराम पगड्या व दोन उपरणी सजत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जून रोजी देहू दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते जगतगुरु संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. त्यावेळी त्यांना तुकारामांची पगडी आणि उपरणे भेट म्हणून देण्यात येणार आहेत.

अधिकाऱ्यांकडून मुख्य मंदिराची पहाणी
आचार्य तुषार भोसले आणि देहू संस्थानाचे विश्वस्थ मंडळींनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांना देहूत येण्याचे आमंत्रण दिले होते. मोंदीनीही त्याच्या आमंत्रणाचा स्वीकार केला होता. १४ जूनला मोदी देहू दौऱ्यावर येणार आहे. मोदींच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाकडून चोख तपासणी करण्यात येत आहे. नुकतेच पोलीस महासंचालक रजनीश् सेठ यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी शिळा मंदिर आणि मुख्य मंदिर परिसराची पहाणी केली.

दोन वर्षानंतर सोहळ्याचे आयोजन
येत्या २० जूनपासून संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यास सुरुवात होणार आहे. गेल्या दोन वर्षापासून करोनामुळे हा सोहळा स्थगित करण्यात आला होता. यंदाच्या वर्षी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्यामुळे हा सोहळा उत्साहात पार पडणार आहे. तसेच सोहळ्याअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूला भेट देणार असल्यामुळे याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *