ठाणेकरांवर कोरोनाचे सावट, जिल्ह्यात आतापर्यंत ९९२ रुग्णांची नोंद

हळू हळू पुन्हा डोके वर काढू लागल्याने ठाणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या ही एक हजाराच्या घरात पोहचली असून ठाणे जिल्ह्यात चक्क चौथी लाट येणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे निर्बंध कडक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोरोनामुळे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेला समोर गेल्यानंतर आखेर कोरोणाचे सावट कमी झाले आणि नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र, काही दिवसांपासून कोरोना पुन्हा डोके वर काढू लागल्याने चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. सध्या ठाणे जिल्ह्यात सक्रिय कोविड रुग्णांची संख्या ९९२ वर येऊन पोहचली आहे. तर ठाणे जिल्ह्यात १९८ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.

सध्या आढळून येणाऱ्या रुग्णांमध्ये जास्तीत जास्त हे ओमायक्रोन (Omicron) बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता ठाणेकरांची चिंता वाढली आहे. ठाण्यात २३ मे पासून पुन्हा रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. २३ मे रोजी ठाणे जिल्ह्यात २१ कोरोनाबधित रुग्ण संख्या तर १७२ सक्रिय रुग्ण होते. मात्र हीच संख्या आता १९८ कोरोणा बाधित आणि ९९२ सक्रिय रुग्णांवर येऊन पोहचली आहे. त्यामुळे चौथी लात सदृश्य परिस्थिती तयार होऊ लागली आहे. जर रुग्ण संख्येत अशाच प्रकारे झपाट्याने वाढ होऊ लागली तर ठाणे जिल्ह्यात पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटे प्रमाणे पुन्हा निर्बंध कडक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठाणे जिल्ह्यात ज्या प्रकारे कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. यावर उपाययोजना म्हणून ठाणे महापालिकेकडून कोविडच्या लसिकरणावर पुन्हा जोर देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी ठाणे महानगर पालिकेकडे मोठ्या प्रमाणात कोविडच्या लसचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी बुस्टर डोसचा लाभ घ्यावा तसेच गर्दीच्या ठिकाणी मास्क आणि सॅनिटाइजरचा वापर करावा असे आवाहन ठाणे जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ. कैलाश पवार यांनी केले आहे. ठाणे महानगर पालिकेकडून ठाणेकरांसाठी ठाण्यातील सिव्हील शासकीय रुग्णालयात लसीकरणात वाढ करून बूस्टर डोस देण्यासाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आल आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *