आपला मुलगा सैन्यात काम करतोय हे प्रत्येक आई-वडिल सर्वांना छाती ठोकपणे सांगू शकतात. कारण त्यांच्या मुलाने आपल्या देशाचं रक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारली असते. परंतु जर देशाचं रक्षण करणारा भाऊ आपल्या बहिणीची आब्रु वाचवु शकत नसेल तर, यापेक्षा दुर्भाग्य ते कोणतं? आपला शेजारी देश श्रीलंका येथील ही धक्कादायक बातमी समोर आली आहे. जी ऐकून लोकं थक्कं झाले आहेत.
आपल्याला तर हे माहित आहे की, श्रीलंका सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. तिथे लोकांना खाण्यापिण्यासाठी देखील पैसे नाहीयत. या सगळ्यात महागाई गगनाला भिडली आहे. अशा स्थितीत श्रीलंकेत मुलींना देहविक्री करण्यास भाग पाडले जात आहे.
दैनिक भास्करमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, गेल्या काही महिन्यांत सेक्स वर्कमध्ये गुंतलेल्या मुलींची संख्या वाढली आहे. त्यांच्यापैकी अनेक जण अशी आहेत की जे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने हे काम करत आहेत.
रिपोर्टनुसार, यापूर्वी श्रीलंकेत प्रोफेशनल वेश्यांद्वारे सेक्स वर्क केले जात होते. पण आजकाल बहुतेक कमी वयाच्या आणि नवीन मुली या व्यवसायात सामील होत आहेत.
श्रीलंकेत वेश्याव्यवसायावर कायदेशीर बंदी आहे. श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्येही वेश्याव्यवसायाचे कोणतेही ठिकाण नाही. परंतु तेथील स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली हे काम सुरू असल्याची माहिती अहवालात आली आहे. या मसाज सेंटर्सच्या नावाखाली नवनवीन मुली या कामात सहभागी होत आहेत.
आर्थिक संकटामुळे ही वेळ
श्रीलंकेत सुरू असलेल्या आर्थिक संकटामुळे अशा मुली वेश्याव्यवसाय करत आहेत, ज्या मुली उच्च शिक्षणाची स्वप्ने पाहत होत्या, अशा मुलींना देखील या व्यवसायात उरण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही.
अशीच कहाणी आहे ईशाची (नाव बदलले आहे) २१ वर्षीय ईशाने सांगितले की, तिला एक यशस्वी व्यक्ती व्हायचे आहे. शिक्षण घेऊन खूप मोठं व्हायचं होतं. परंतु तसे होऊ शकलेले नाही.
शेवटी घरची एकून परिस्थिती पाहाता ईशा स्पामध्ये काम करु लागली. पूर्वी ती एका कंपनीत दरमहा २५ हजार रुपये पगारावर काम करत होती. पण कोरोनानंतर बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे तिची नोकरी गेली आणि ती स्पामध्ये काम करू लागली. यानंतर तिने वेश्याव्यवसायही सुरू केला.
घरची परिस्थिती चांगली असती तर तिने हे काम कधीच केले नसते, असे ती सांगते.
सुमारे 40 हजार मुली वेश्याव्यवसाय करत आहेत
ईशासारख्या सुमारे ४० हजार मुली वेश्याव्यवसाय करत असल्याचे अहवालात म्हटले आहे. यापैकी निम्म्याहून अधिक राजधानी कोलंबोमध्ये आहेत. कोलंबोतील ही स्पा सेंटर्स चोवीस तास सुरू असतात. आयुर्वेदिक उपचार, वेलनेस सेंटर, स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाने सुरू असलेली ही केंद्र राजधानीच्या पॉश भागात आहेत.
अशाच एका स्पा सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका मॅनेजरने सांगितले की, अलीकडच्या काळात काम शोधणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे. त्यांनी सांगितले की, यातील बहुतांश असे आहेत जे कुठेतरी नोकरी करून घर चालवत होते. मात्र नोकरी गेल्याने तो चिंतेत आहे.
