चर्चमध्ये प्रार्थना सुरू असतानाच बेछूट गोळीबार केला; हल्ल्यात लहान मुलांसह ५० जणांचा जागीच मृत्यू

 दक्षिण- पश्चिम नायजेरियातील एका कॅथलिक चर्चमध्ये रविवारी प्रार्थनेसाठी जमलेल्या जमावावर बेछूट गोळीबार करण्यात आला. काही ठिकाणी स्फोट घडवल्याची माहितीही समोर येत आहे. या घटनेत कमीत कमी ५० जण जखमी झाले आहेत.

पेंटेकोस्ट संडेसाठी भाविक चर्चमध्ये जमा झाले होते. याचवेळी प्रार्थनेदरम्यान बंदूकधाऱ्यांनी जमावावर बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात शेकडो गंभीर जखमी झाले आहेत. तर, लहान मुलांसह महिलांवरही गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत कमीत कमी ५० जणांचा मृत्यू झाला आहे.

नायजेरियातील ओंडो राज्यातील सेंट फ्रान्सिस कॅथोलिक चर्चवर हल्लेखोरांनी हा हल्ला घडवला आहे. हल्लेखोरांची ओळख अद्याप पटलेली नसून या हल्ल्यामागचा हेतूही स्पष्ट झाला नसल्याचं स्थानिक नेत्यांकडून सांगण्यात येतंय. तसंच, या हल्ल्याचा तपास सुरू असून काही वेळातच पोलिस हल्ल्याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना देणार आहेत.

नायजेरियातील स्थानिक नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात ५० जणांचा मृत्यू झाला आहे. महिला व लहान मुलांचाही समावेश आहे. मात्र, स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यातील मृतांची संख्या वाढण्याची भिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *